Ad will apear here
Next
Happy Valentine’s Day!! असंच होतं ना तुलाही...!
व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने मीनल खेडकर यांनी ‘असंच होतं ना तुलाही’ या मिलिंद जोशी यांच्या कवितासंग्रहाबद्दल व्यक्त केलेले मनोगत... 
.....

‘पहाटे पहाटे मला जाग आली...’
‘येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे... ’
‘केव्हा तरी पहाटे... ’

ए, ए, ए, Hello, hellooo... काय चाललंय काय हे? आजपण हीच गाणी? गेले सात दिवस आपण हेच साजरं केलंय... आज जरा वेगळं शोध... बघ... हे ऐक ना... 

पाण्याच्या प्रहरी
गाण्याच्या लहरी
पानांची चवरी
रानात गं... 
येई शिरशिरी
जसा यावा हरी
वाजते बासरी
प्राणात गं... 

आवडलंय तुला ना? मग मान्य कर ना... कसा चेहरा हसतोय तुझा बघ... हो, ही नवीनच आहे कविता... आता पहिल्यांदा तुलाच थेट ऐकवली... मी ही नव्हती ऐकली... म्हटलं दोघंही एकत्रच ऐकू आज... !!... एवढी घाई कसली तुला??? एवढंच ना? ठीक आहे, पण आधी, तू डोळे बंद नि हात पुढे कर... काय??? मी पण डोळे बंद नि हात पुढे करू??? काय बालिशपणा चाललाय आपला? आपली मुलं पण असं नाही करत आता... चम्मतग गं... बरंरंरं... hmmm... केले हात पुढे... OMG! OMG!! OMG!!! मिलिंद जोशी यांचा कवितासंग्रह... 

‘असंच होतं ना तुलाही’ --- by मिलिंद जोशी

Happy Valentine’s Day!!
Ohhhh, Yesss... 
Happy Valentine’s Day to you too.. !!!

कसं ना same पुस्तक घेऊन आलो आपण एकमेकांसाठी... अगदी एक मन आपलं... 

असंच होतं ना तुलाही... खरंच... बरोबर ना... असंच होतं ना तुलाही... 

इकडे बघ ना... काल माझा मित्र मला सांगत होता, की या पुस्तकातल्या पान नं. १४, २३, २५, ३६, ४४, ५८, ६३, ७७वरच्या कविता त्याला खूप भावल्या म्हणे... यात हसण्यासारखं काय... आता तू हे नको सांगू मला, की तुझ्या मैत्रिणीने तुला पान नं. १७, , २६, २७, २८, ४७ वरच्या कविता What’sApp केल्या म्हणून... आणि तिला त्या soliiiiiid real वाटल्या... वगैरे... 

बाय द वे, मला सांग, आता यातल्या कोणकोणत्या कविता कुणाकुणाला What’sApp करणार तू?... नक्की कोणकोण येतंय डोळ्यासमोर... ऑ, ऑ,.. कसला विचार चाललाय नक्की? Idea..!!! कळलं मला... ८/१० कविता What’sApp करण्यापेक्षा BOOKGANGA.COM वरून order place करून थेट friends ना पाठवलं तर... Surprise... endlesss joy... What an idea ji.. 

बरं आता ऐक ना... ही कविता -  आधीचं’

तुझं वर्णन करायला
वापरावी लागतात
अक्षरं... मौनाची
भाषा... न बोलण्याची
आनंद... स्तब्धतेतला

हे सगळं
आता अधिकच खोल जाऊ लागलंय... 
आपलं नातं असावं... 
मौनाहूनही खोलातलं... 
आपल्याला ‘तू’ आणि ‘मी’
असं नाव मिळण्याआधीचं... 

केवढं intense लिहिलंय हे सरांनी... तर पुढची ‘पाऊस’ कविता बघ... 

ढगांमधून चालताना
हिरवीगार गवताची रानं पाहताना
गवताच्या पात्यांना बिलगलेले
पावसाचे थेंब पाहताना
थंड आणि ओली हवा अनुभवताना
कुणाशी तरी पहिली भेट झाल्यासारखं
वाटत राहिलं... 
ही भेट पहिली नाही असंही वाटत राहिलं
हे सगळं आपलंच असूनही
आपलं नाही असं वाटत राहिलं... 

किती खरी आणि आपली वाटते ही कविता... या पुस्तकातल्या अशा बऱ्याच कविता अशा आहेत, की ज्या फक्त आपल्या आणि आपल्याच भावना व्यक्त करतात, असं वाटतंय... 

‘पुढे काय,’ ‘मैत्र,’ ‘फुगा,’ ‘निनावी,’ ‘स्पर्श,’ ‘ध्यास,’ ‘हसू,’ ‘फोनकॉल’ अशा काही कविता वाचल्या, की वाटतं आपण सरांशी गप्पा मारता मारता आपल्याच भावना त्यांनी शब्दबद्ध केल्यात.. 

इतकंच काय, पण त्या वाचताना आपण त्या कविता गात आहोत असं वाटतं..

स्वप्न, मन, आठवणी, पाऊस, प्रेम, विरह, एकांत, दुरावा अशा विविध विषयांवर अगदी सहजपणे गातात या कविता... 

आता ही ‘कुणी तरी’ कविता ऐक ना... 

पावसाबद्दल तुला जे वाटतं
आणि मला जे वाटतं
यात जमीन अस्मानाचा फरक असेलही
पण त्यामुळे पाऊस खोटा ठरत नाही, 
भरून यायचं ते भरून येतंच, 
कोसळायचं ते कोसळतंच, 
भिजायचं ते भिजतंच, 
वाहून जायचं ते वाहून जातंच... 
कुणी तरी... 
पावसाची वाट पाहतंच... 

प्रत्येक कविता ही अशी वेड लावून जाणारी आहे ना?... खरंय... पण तुला एक सांगू ?... हे पुस्तक उघडता क्षणीच जी पहिली कविता आहे ना ती खूप काही सांगून जाते... ऐक... 

उघडकीस येण्याबद्दलच बोलायचं तर... 
कवितेइतकी एक्सपोज करणारी
दुसरी कोणतीच
गोष्ट नसेल... 
पण त्यासाठी
कविता
खरी खरी हवी
आणि वाचणाऱ्याच्या
हृदयाला
नजर हवी... 

क्या बात है मिलिंद सर!!!हे फारच आवडलं... 

बघितलंस ना... कविता काय, माणसं काय... ती वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठीसुद्धा हृदयाला नजर हवी... 

आता काय??? यातल्या बऱ्याच कविता इथे वाचायच्या राहून गेल्यात... पण तुम्ही प्रत्येकाने जरूर वाचा... मिलिंद जोशी लिखित, ‘असंच होतं ना तुलाही’

आज Valentine’s day... या मंगलमय प्रेमदिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा...!!

Happy Valentine’s Day... !!

- मीनल खेडकर, डोंबिवली

(‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा. त्याचे ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहातील काही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या कवितासंग्रहाबद्दलचा एक अभिप्राय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)




















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZTWCJ
Similar Posts
Valentine's Day : ‘ही’ हस्ताक्षरातील प्रेमकविता नक्की वाचा! आज व्हॅलेंटाइन्स डे... मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही’ या कवितासंग्रहातील ही प्रेमकविता नक्की वाचा...
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
कवीच्या हस्ताक्षरातील पहिल्या कवितासंग्रहावर प्रकाशनपूर्व सवलत पुणे : संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असलेल्या मिलिंद जोशी यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहे. २० डिसेंबर २०१९ रोजी त्याचे प्रकाशन होणार असून, त्याआधी नोंदणी केल्यास तो २० टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे.
आज जागतिक हस्ताक्षर दिन! सुंदर हस्ताक्षरातल्या अर्थपूर्ण कविता... ‘असंच होतं ना तुलाही!’ डिजिटल युगात हातानं लिहिण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे ही वस्तुस्थिती; पण हातानं लिहिण्यातला आणि सुंदर, वळणदार अक्षरांत लिहिलेलं वाचण्यातला आनंद डिजिटल अक्षरांना येत नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच दर वर्षी २३ जानेवारीला जागतिक हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून ‘असंच होतं ना तुलाही’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language